Uttarvahini Narmada Parikrama Mahiti in Marathi and English
।। नर्मदे हर ।।
Uttarvahini Narmada Parikrama
Mahiti :-
नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे.तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.
ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची साद्यंत माहिती प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ’उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा” या पुस्तकात मिळते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छाश सेवा (ताक) देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून वाटसरूची दक्षिणतट परिक्रमा संपते. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या पुस्तकात भौगोलिक माहितीचीही जोड देण्यात आली आहे. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके काय, उत्तर आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळते.
या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्वर येथील श्रीवासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्वर येथील श्रीरंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान, कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो.
Uttarvahini Narmada Parikrama Importance And Information In English
Narmada Parikrama is a famous religious fast. At Tilakwada (Gujarat), the river Narmada is a tributary and then it continues to the north till Rampur and then its flow is reversed. The circumambulation of Tilakwada-Rampura-Tilakwada at a distance of 21 km from the banks of Narmada is called Uttaravahini Narmadaparikrama. Devotees who are not able to complete the Parikrama circumambulate the Uttaravahini. In the area from Tilakwada to Rampura, this Uttarvahini Parikrama is performed only in the month of Chaitra. It is said in the Narmada Purana and Skanda Purana that whoever performs the Uttarvahini Narmada Parikrama in the month of Chaitra, will get the virtue of doing the entire Narmada Parikrama.
The circuit starts from Tilakwada on the North Coast, and at the end of the North Coast, the boat has to reach Rampura on the opposite shore. After arriving here, after taking a bath on the first ghat, taking water from the Narmada Maiya, offering it on the pindi of Lord Shiva in the Tirtheshwar Mahadev temple on the ghat, the procession starts from the south bank. When the south coast is completed, the boat returns to the north coast, and the cycle ends with a bath. Simple information about this 21 km circumnavigation of Pvt. It is found in the book 'Uttaravahini Narmada Parikrama' written by Kshitij Patukale. On the way to Parikrama, passing through a small village, you come across some temples and ashrams. Welcome to Narmada Har ... Narmada Har ... everywhere. Some churches in the village provide cold water, syrup, tea, fruits or tea to the pilgrims. The northbound road of Parikrama Marg is the one that passes through the village as well as the shore. In some places the wait is difficult. But without any trouble, Vatsaru crosses the north coast comfortably. The south coast route, on the other hand, is mostly asphalt road. There is a Tirtheshwar Mahadev temple on the Rampura ghat on the south bank. Here Radhagiri Mataji arranges breakfast and lunch for the children of Parikrama. Here the journey continues with the child. On the way there is a small village called Mangrol. The people of the village together serve the pilgrims. Here a large pavilion is arranged for the rest of the pilgrims. The name of this circle is Visao Mangrol Circle. Board workers are very service-minded. From there it goes to Tapovan Ashram. In this ashram, they provide buttermilk service (buttermilk) for the pilgrims and at the end of it, there is the ashram of Sreesitaram Baba. The premises of the ashram are very beautiful and picturesque. Maya was seen in front of the ashram. Here, after taking lunch and resting, the south coast circumambulation of Watsaru ends. Pvt. Geographical information has also been added in Kshitij Patukale's book. The book provides detailed information about the story, history of the river Narmada, what is Uttaravahini Parikrama, the journey on the north and south banks, Datta Sampradaya and Narmada Parikrama, pilgrimage sites on the way to Parikrama, nearby pilgrimage sites etc.
Along with this pilgrimage comes the Samadhi Darshan of Srivasudevanand Tembe Swami Maharaj at nearby Garudeshwar, the Samadhi Darshan of Srirangavadhutji Maharaj at Nareshwar, the place of Dattaprabhu's mother at Ansuya, the temple of Kubera at Karnali-Kubre Bhandari and the holy Dattasthan at Koteshwar.
Comments
Post a Comment
नर्मदे हर...