Samudra Panchkoshi Narmada Parikrama Information in English - Marathi - Shri Rajrajeshwari Narmada Parikrama Tours-Travels
_________।। नर्मदे हर ।। _________
समुद्र पंचकोषी नर्मदा परिक्रमा
मां नर्मदा
In English :-
* Sea Five-Cross Narmada Circulation! *
Narmada Mai's Parikrama is a unique ceremony. Many people do this parikrama. All devotees will benefit from seeing some of the shrines where it meets the Ratnasagara (Arabian Sea). Shri Koteshwar and Shri Vimaleshwar were seen on the south bank. The entire area near Hansot near Bharuch is a huge triangular region of Narmada Mai. In these two places it merges with the sea on the south side. There is a unique yoga that comes together after the darshan. This Parikrama has been performed by thousands of devotees for somavati amavasya for years! This year Somvati Amavasya is on 30th May 2022. On that day, Abhiyana is organizing this Samudra Panchkroshi Narmada Parikrama! However, most of the narcissists in this no
* This Parikrama is called 'Samudra Panchkoshi Parikrama' in Hindi. Panchkoshi Parikramas are performed in various places of pilgrimage in the north. In the same way, the sea revolves around five crores! This circumambulation is performed on the north shore of the Narmada Maiya Sagar. Panchkroshi is the area of five kosas! One kos is two miles or 3.12 kilometers. This means that the circumference is approximately 15.06 km. Roughly 20 kilometers. It can be done on foot or by vehicle. I did by vehicle. It was about 25 kilometers. *
* Due to the arrival of Dowry Special Economic Zone in this Panchkroshi Parikrama Marg in Wagra taluka of Bharuch district of Gujarat, there is unity among the villages there. There are mainly five villages along this route. The villages are Dahej, Ambheta, Jageshwar, Luwara and Lakhigam. *
* This Samudra Panchkroshi Parikrama is also called 'Navnath Parikrama'. This name is prevalent as there are nine places of Mahadev on this route. Each location is unique. It has a tradition of hundreds of years. They have been established by God and sages. There have been thousands of rituals to date. There are many stories out there. There is ample evidence that all temples are ancient. The government has improved road connectivity. Moreover, the temple premises are being razed. So the journey was a successful one. *
The following are the locations in the Ocean Five Cross Circuit: *
* 1) Shri Bhootnath Mahadev: Here Brahma, Vishnu and Mahesh are established in linga form. They have been established by Mahadev. Nearby is Sri Sikotar Mata Mandir. There is a dense acacia forest near the temple. There is Baneshwar Kund and Shivling made by Bhima by shooting arrows. There is an ancient cemetery. Due to the dense vegetation and the surrounding industrial area, this forest area is home to nilgai, snakes, hyenas, foxes and hundreds of birds. The companion has many snakes and hundreds of peacocks. There are so many peacocks here that there is literally a peacock-forest as food is easily available due to the activities of the generous Gujarati community. Food donations for the people are started regularly. It was learned that many Tantra seekers are staying here. Many people from Vadodara (Baroda) and Bharuch always come for service. *
* 2) Shri Makhaneshwar Mahadev: This divine field power is established and it is also called as Shri Mankameshwar Mahadev Temple. The main temple is currently undergoing renovations. There is a beautiful temple of Narmada Maiya in the courtyard. *
* 3) Shri Dudheshwar Mahadev: This Shivling Dadhi has been established by sages. Dadhicha village was later renamed as 'Dahej' as the abode of Dadhichi sages. The temple precincts are very beautiful. The overall structure is such that one should remember Mahakaleshwar Mahadev of Ujjain while visiting the temple. There is a separate hall and accommodation for priests and devotees as it is regularly performed here. The courtyard is beautifully furnished with birds. *
* 4) Shri Nilkantheshwar Mahadev: This temple is located on the main highway when you go towards Dahej village. Currently, the restoration work is in full swing here too. This Shivling is a Banaling form. In the courtyard are bell, wad and pimple trees. Accommodation and worship are arranged. *
* 5) Shri Chandramouleshwar Mahadev: This temple is located in the sattvic and beautiful precincts of Shri Krishnananda Ashram in Ambheta village. As Reva Sangam is close to the temple, there is a beautiful accommodation arrangement for the pilgrims. Mahadev has Mata Ashapura, Shri Umiyanath, Narmada Maiya and Kalbhairav temples. There is a lake nearby. *
* 6) Shri Jagnath Mahadev: Jagannath Mahadev Temple is the main pilgrimage site of Jageshwar village. The temple precincts are very large. The arrangement is excellent. The temple has idols of Ganapati, Hanuman, Kalika, Saraswati and Durga. There are separate buildings for the activities of the villagers and for the arrangement of the pilgrims. Monks are arborists; So many flowers are well taken care of. Accommodation for personal rituals and religious ceremonies. *
* Jageshwar is near Mithitalai. This is the place where Parikramavasi crosses the Reva Sangam and descends to the North Coast. At present a huge jetty is being constructed by the Gujarat government to make it easier for the pilgrims to reach the shore. Near this jetty is Dahej-Ghogha (Bhavnagar) Ro-Ro ferry service jetty. This has made it possible to reach Saurashtra from South Gujarat. Mithitalai has a large ashram and excellent accommodation. There is a big temple of Narmada Maiya. *
* 7) Shri Markandeshwar Mahadev: This temple is located in a beautiful place called Shri Hari Maharaj Ashram. This Shivling has been installed by the Markandeya sage. Hari Maharaj Ashram has a beautiful idol of Radhakrishna and is designed like an ancient mansion. Some people come here from different parts of Gujarat for regular service. *
* 8) Shri Parashurameshwar Mahadev: The most ancient place on this path! This Shivling has been established by Lord Parashuram himself. After so many centuries of mud, the land has now reached the top of the temple. Naturally, if you want to visit, you have to go down. The construction of the temple is simple. The priests live in the synagogue. They take care of everyone who comes. Offer regular meal offerings. The surrounding residents are also very service-minded. Since hundreds of saints and mahants have performed sadhana in this place, it is a suitable place for seekers. *
* 9) Shri Loteshwar Mahadev: There are some evidences of Pandavas coming and going on this Parikrama Marg. This is one of them. Some people say that this is the place where Bhima achieved success through penance. In reality, Nandikeshwar has set up this Shivling. Bhima had placed Lota on it to protect it, hence the name Loteshwar. Some people even call him Lutneshwar. The feature of this Shivlinga is its shape. This Shivling was made at the place where Nandikeshwar set foot. So its shape is like the hooves of a cow. Therefore, people also call it 'Gai Ni Khari' (hoof) Shivling. This is also an ancient site, so we have to get down to the ground. *
* Shri Lakhabawa Dada Temple: In the precincts of Loteshwar Mahadev is the Samadhi place of the famous Siddhapurus Shri Lakhabawa Dada. Narmadabhakta and Siddhi are saints of the ancient local Koli community. People with childlessness and professional difficulties come here to see the crowd of vow payers. Shivling is installed on the Samadhi and Lakhabawa Dada's 'place' is on the door of the temple. This is a very different place. (Some Marathi people - especially some Marathi YouTuber Parikramavasi, pronounce Baba's name as Lakhababa but the locals insisted that it should be done as Lakhabawa Dada!) The temple precincts are neat. All amenities are. Nearby is Lakhabawa Dada's pond. It usually has water all year round. *
* So there were nine Mahadev places that completed our sea-cruising cycle! *
In Marathi :-
नर्मदा माईची परिक्रमा हा एक अपूर्व सोहळाच असतो. अनेक जण ही परिक्रमा करतात. ती जिथे रत्नसागराला (अरबी समुद्र) मिळते तेथील काही तीर्थांच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांना होणार आहे. दक्षिण किनाऱ्यावरील श्री कोटेश्वर आणि श्री विमलेश्वर यांचं दर्शन झालं. भरुच जवळच्या हांसोट जवळचा हा संपूर्ण परिसर म्हणजे नर्मदा माईचा विशाल त्रिभुज प्रदेशच आहे. याच दोन ठिकाणी ती दक्षिण बाजूने सागर विलीन होते. तेथील दर्शन झाल्यावर एक अपूर्व योग जुळून येतो तो योग असतो, नर्मदा पंचक्रोशी परिक्रमा करण्याचा. ही परिक्रमा सोमवती अमावास्येला हजारो भक्त वर्षानुवर्षे करत आली आहेत! ह्यावर्षी सोमवती अमावास्या 30 मे 2022 ला आहे त्या दिवशी अभियाना तर्फ़े ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा करण्याचे आयोजन करत आहे! तरी जास्तीत जास्त नर् भक्तांनी या सं
*ह्या परिक्रमेला हिंदी मध्ये 'समुद्र पंचकोशी परिक्रमा' म्हणतात. उत्तरेत विविध तीर्थक्षेत्रांमध्ये पंचकोशी परिक्रमा केल्या जातात. तशी ही समुद्र पंचक्रोशी परिक्रमा! नर्मदा मैय्या सागराला मिळते तेथील उत्तर किनाऱ्यावर ही परिक्रमा केली जाते. पंचक्रोशी म्हणजे पाच कोसांचा परिसर! एक कोस म्हणजे दोन मैल किंवा ३.१२ किलोमीटर. म्हणजेच ही परिक्रमा साधारणपणे १५.०६ किलोमीटर परिसरात होते. ढोबळमानाने, ती २० किलोमीटर आहे. ती चालत किंवा वाहनाने करता येते. मी वाहनाने केली. ती जवळपास २५ किलोमीटर होते.*
*गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील वागरा तालुक्यातील या पंचक्रोशी परिक्रमा मार्गात दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन आल्यामुळे तिथल्या गावांमध्ये एकसंधता आली आहे. या मार्गात मुख्यत्वे पाच गावे आहेत. दहेज, अंभेटा, जागेश्वर, लुवारा आणि लखीगाम ही ती गावे.*
*या समुद्र पंचक्रोशी परिक्रमेला 'नवनाथ परिक्रमा' असंही म्हणतात. या मार्गावर महादेवाची नऊ स्थाने असल्याने हे नाव प्रचलित आहे. प्रत्येक स्थान विशिष्ट आहे. त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यांची स्थापना देव आणि ऋषींच्या हस्ते झाली आहे. आजवर तेथे हजारो अनुष्ठाने झाली आहेत. तिथल्या अनेक कहाण्या आहेत. सर्व मंदिरे प्राचीन असल्याचे अनेक पुरावे आहेत. शासनाने रस्ते जोडणी उत्तम केली आहे. शिवाय मंदिर परिसर कात टाकत आहेत. त्यामुळे यात्रा सुफळ संपूर्ण होते.*
*समुद्र पंचक्रोशी परिक्रमेतील स्थाने खालीलप्रमाणे आहेत:*
*१) श्री भूतनाथ महादेव: येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश लिङ्ग स्वरूपात स्थापित आहेत. त्यांची स्थापना महादेवांनी केली आहे. जवळच श्री सिकोतर माता मंदिर आहे. मंदिराजवळ दाट बाभळीचं वन आहे. भीमाने बाण मारून तयार केलेलं बाणेश्वर कुंड आणि शिवलिङ्ग आहे. पुरातन कालीन स्मशान आहे. दाट झाडी असल्याने व आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र झाल्याने हा जंगल भाग निलगायी, साप, तरस, कोल्हे आणि शेकडो पक्षी यांचा अधिवास झाला आहे. सोबतीला अनेक साप आणि शेकडो मोर आहेत. दानशूर गुजराती समाजाच्या उपक्रमांमुळे सहज अन्न उपलब्ध होत असल्याने अक्षरशः मयूर-वन आहे की काय असं वाटावं इतके मोर इथे आहेत. लोकांसाठी अन्न दान नियमितपणे सुरू असतं. अनेक तंत्र साधक इथे मुक्कामाला असतात अशी माहिती मिळाली. सेवेसाठी वडोदरा (बडोदा) आणि भरुचहून अनेक जण नेहमी येतात.*
*२) श्री मखनेश्वर महादेव: हे दिव्य क्षेत्र शक्ती स्थापित असून त्यांस श्री मनकामेश्वर महादेव मंदिर असंही संबोधलं जातं. मुख्य मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. प्रांगणात नर्मदा मैय्याचं देखणं मंदिर आहे.*
*३) श्री दुधेश्वर महादेव: हे शिवलिङ्ग दधिची ऋषींनी स्थापन केलं आहे. दधिची ऋषींची तपोभूमी म्हणून दाधिच गावाचे कालांतरानं 'दहेज' नामाभिधान झालं. मंदिर प्रांगण अतिशय देखणं आहे. गाभाऱ्यात गेल्यावर उज्जैनच्या महाकालेश्वर महादेवाची आठवण यावी, अशी एकंदर रचना आहे. इथे नित्य स्वरूपात विविध अनुष्ठाने होत असल्यानं त्यासाठी एक वेगळा हॉल आणि पुजाऱ्यांची- भाविकांची निवास व्यवस्था चांगली आहे. अंगणात पक्ष्यांच्या राहण्याची सुंदर सोय केलीय.*
*४) श्री निलकंठेश्वर महादेव: दहेज गावाच्या दिशेनं निघाल्यावर अगदी मुख्य हमरस्त्यावर दिसणारं हे मंदिर नीलकंठ महादेव स्थापित आहे. सध्या इथेही जीर्णोद्धार जोरात सुरू आहे. हे शिवलिङ्ग बाणलिङ्ग स्वरूप आहे. प्रांगणात बेल, वड आणि पिंपळ वृक्ष आहेत. निवास आणि पूजन व्यवस्था आहे.*
*५) श्री चंद्रमौलेश्वर महादेव: अंभेटा गावातील श्री कृष्णानंद आश्रमाच्या सात्त्विक आणि देखण्या प्रांगणात हे मंदिर आहे. देवळापासून रेवा संगम जवळ असल्यानं परिक्रमावासियांच्या निवासाची सुंदर व्यवस्था इथे आहे. महादेवाजवळ माता आशापुरा, श्री उमियानाथ, नर्मदा मैय्या आणि कालभैरव मंदिरे आहेत. येथून जवळच एक तलाव आहे.*
*६) श्री जागनाथ महादेव: जागेश्वर गावाचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेलं हे जागनाथ महादेव मंदिर आहे. मंदिर प्रांगण खूप मोठं आहे. व्यवस्था उत्तमच आहे. देवळात गणपती, हनुमान, कालिका, सरस्वती, दुर्गा विग्रह आहेत. गावकऱ्यांच्या उपक्रमांसाठी आणि परिक्रमावासियांच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. महंत वृक्षप्रेमी आहेत; त्यामुळे असंख्य फुलझाडं उत्तमरित्या सांभाळली आहेत. वैयक्तिक अनुष्ठाने आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी निवास आहेत.*
*जागेश्वर जवळच मिठीतलाई आहे. याच ठिकाणी परिक्रमावासी रेवा संगम पार करून उत्तर तटावर उतरतात. सध्या गुजरात शासनातर्फे परिक्रमावासियांना तटावर येणं सोपं व्हावं म्हणून विशाल जेट्टी बांधली जात आहे. या जेट्टीजवळ दहेज-घोघा (भावनगर) रो-रो फेरी सर्व्हिस जेट्टी आहे. दक्षिण गुजरात मधून सौराष्ट्रात जाण्याचा जवळचा मार्ग यामुळे उपलब्ध झाला आहे. मिठीतलाई मध्ये मोठा आश्रम असून उत्तम निवास व्यवस्था आहे. नर्मदा मैय्याचं मोठं मंदिर आहे.*
*७) श्री मार्कंडेश्वर महादेव: श्री हरि महाराज आश्रम या सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी हे शिवलिङ्ग स्थापित केलं आहे. हरि महाराज आश्रमात राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणि पुरातन हवेली प्रमाणे रचना आहे. इथे काही लोक गुजरात मधील विविध ठिकाणांहून नियमित सेवेसाठी येत असतात.*
*८) श्री परशुरामेश्वर महादेव: या मार्गावरील अति-प्राचीन स्थळ! स्वतः भगवान परशुराम यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. इतक्या शतकांच्या गाळात भर पडून पडून आता जमीन मंदिराच्या शिखराला भिडली आहे. साहजिकच दर्शन घ्यायचं असेल तर खाली उतरून जावं लागतं. मंदिराचं बांधकाम साधं आहे. पुजारी सभामंडपातच राहतात. आलेल्या सर्वांची बडदास्त ठेवतात. नियमित भोजन प्रसाद देतात. आजूबाजूचे रहिवासी सुद्धा खूप सेवाभावी आहेत. या ठिकाणी शेकडो संत महंत साधना करून गेले असल्याने साधकांसाठी ही योग्य अशी जागा आहे.*
*९) श्री लोटेश्वर महादेव: या परिक्रमा मार्गावर पांडव येऊन गेल्याचे काही दाखले आहेत. त्यापैकी ही एक जागा आहे. भीमाने तप करून सिद्धी मिळवली ती ही जागा असं काही लोक सांगतात. साक्षात नंदिकेश्वर यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. त्याचं रक्षण व्हावं म्हणून भीमाने त्यावर लोटा ठेवला होता म्हणून लोटेश्वर असे नाव पडले. काही लोक त्याला लुटणेश्वर देखील म्हणतात. या शिवलिङ्गाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार. नंदिकेश्वरांनी जिथे पाय ठेवला तिथेच हे शिवलिङ्ग तयार झालं. त्यामुळे त्याचा आकार गायीच्या खुरांसारखा आहे. त्यामुळे लोक त्याला 'गाय नी खरी' (खुर) शिवलिङ्ग सुद्धा म्हणतात. हे देखील प्राचीन स्थळ असल्यानं आपल्याला जमिनीत उतरून जावं लागतं.*
*श्री लखाबावा दादा मंदिर: लोटेश्वर महादेव प्रांगणातच येथील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री लखाबावा दादा यांचं समाधी स्थळ आहे. नर्मदाभक्त आणि सिद्धी प्राप्त असलेले हे प्राचिनकालीन स्थानिक कोळी समाजातील संत पुरुष आहेत. निपुत्रिक आणि व्यावसायिक अडचणी असलेल्या लोकांना इथे प्रचिती येत असल्याने नवस फेडणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. समाधीवर शिवलिङ्ग स्थापित असून गाभाऱ्याच्या दरवाजावर लखाबावा दादा यांचं 'स्थान' आहे. खूप वेगळी अशी ही जागा आहे. (काही मराठी लोक - विशेषतः काही मराठी युट्युबर परिक्रमावासी, बाबांच्या नावाचा उच्चार लख्खाबाबा करतात पण तो तसा नसून लखाबावा दादा असाच करावा असं स्थानिकांनी आवर्जून सांगितलं!) जवळच लखाबावा दादांच्या गुरूंची समाधी देखील आहे. मंदिर प्रांगण नीटनेटकं आहे. सर्व सोयीसुविधा आहेत. जवळच लखाबावा दादांचे तळे आहे. त्याला साधारणपणे वर्षभर पाणी असतं.*
*तर अशी नऊ महादेव स्थाने झाली की आपली समुद्र पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण झाली!*
*नमामि देवी नर्मदे!*
By Shri Rajrajeshwari Narmada Parikrama Tours - Travels
Comments
Post a Comment
नर्मदे हर...